सख्खे भाऊ करायचे रिक्षातून सिरपची तस्करी; पोलिसांनी फिल्मीस्टाइल पाठलाग करून पकडले

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता जिन्सी पोलीस आणि गुन्हे ब्युरो) : शाखेने सोमवारी (दि. २०) मध्यरात्री केलेल्या एका धाडसी कारवाईत कफ सिरपच्या ११२ बाटल्या जप्त केल्या आहेत. रिक्षाचा थरारक पाठलाग करत गुन्हे शाखा आणि जिन्सी ठाण्याच्या पोलिसांनी शहागंजमधील दोन सख्ख्या भावांच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणी सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या रॅकेटची पाळेमुळे शोधून काढत आहेत.
मोहम्मद उस्मान अब्दुल सलाम मोकाती (२४), मोहम्मद सोफियान अब्दुल सलाम मोकाती (३३, दोघे रा. चाऊस कॉलनी, शहागंज) अशी आरोपींची नावे आहेत. यातील सोफियान हा रेकॉर्डवरील आरोपी आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली.
२० एप्रिलच्या मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास गुन्हे शाखेचे पथक
बाटलीचा रेट केला ४०० हून ८०० पर्यंत
शहर पोलीस आणि अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (एएनटीएफ) पथकाने आतापर्यंत जोरदार कारवाया केल्यामुळे शहरात गुजरात, मध्यप्रदेश येथून येणाऱ्या नशेच्या औषधींचा पुरवठा घटला आहे. दक्षिणेकडून येणारा गांजाही कमी झाला आहे. त्यामुळे या आरोपींनी एका बाटलीचा रेट ३८०-४०० रुपयांवरून थेट ७५०-८०० रुपये केला आहे. पुरवता कमी झाल्याने हे रेट वाढल्याचे सांगितले जाते.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात फरार आरोपींच्या शोधार्थ गस्त घालत होते. त्याचवेळी चालकाने पोलिसांना पाहून रिक्षा (एमएच २० ईएफ ७६०५) सुसाट पळविली. संशय आल्यामुळे गुन्हे शाखा निरीक्षक गजानन कल्याणकर आणि जिन्सी ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संदीप काळे, अभिजित
चिखलीकर, अंमलदार संदीप तायडे, संजय गावंडे, संतोष पारधे, मनोज विखणकर, अमोल मुगळे, बाळू नागरे आणि पुजा इंगळे यांच्या पथकाने रिक्षाचा पाठलाग सुरू केला.
अडविलेल्या रिक्षाची झडती घेतली असता चालकाच्या सीटखाली एक खास कप्पा तयार केला होता. त्या कप्यात नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या कफ सिरपच्या तब्बल ११२ बाटल्या लपवून ठेवल्याचे दिसले. बाटल्यांची किंमत १८ हजार ४८० रुपये असली, तरी रिक्षा आणि मोबाईलसह पोलिसांनी एकूण १ लाख २८ हजार ३६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
https://epaper.sanjwarta.i Powered By: Vrudhee Solutions